प्रिय भाऊना,
सप्रेम नमस्कार
खूप दिवसांनी खरे तर खूप महिन्यांनी मी तुम्हाला पत्र लिहित आहे. आयुष्यात खूप घडामोडी झाल्या आणि तुम्हाला पत्र लिहायचे राहून गेले.
आज हे पत्र तुम्हाला ति. मामा आजोबा ७ एप्रिलला ब्रीस्बैन मध्ये देवाघरी गेले हे सांगायला लिहित आहे. ७ एप्रिलला त्याच्या बरोबर माणिक आत्या, मंगला आत्या, सत्यजित आणि त्याची बायको आणि नातवंड होती. ११ एप्रिलला त्याचा अंतिम संस्कार बापट काकांनी केले. शर्मिली, पराग आणि मी ब्रीस्बैन ला गेलो होतो. आम्ही तिघे कानिटकर आणि आमच्या सर्व परिवारांना तर्फे श्रद्धांजली द्यायला गेलो होतो. खूप खूप जुन्या आठवणी डोळ्यातून वाहत होत्या. मामा आजोबा गेले आणि एक पर्व संपले. मामा आजोबा आपल्या घरातले शेवटचे मोठे छत्र होते. आता मात्र खर्या अर्थांनी आम्ही पोरके झालो.
काल मेल्बुर्न मध्ये त्यांना एक श्रद्धांजली चा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळानी आयोजित केला होता. आम्ही सर्व सत्यजित, ऋत्विक, रोहित राजूरकर आणि पराग, प्राजक्ता, संनिधी लेले आणि शर्मिली व मी गेलो होतो. मी काल आपल्या सर्वन तर्फे चार शब्ध बोलले आणि एक चार ओळि ची कविता लिहिली. मी मार्च २०१० मध्ये मामा आजोबा कडे ४ दिवस राहायला गेले होते. ८ मार्च ला त्यांनी मला शेवटचे पत्र लिहिले होते. त्यातला थोडा मजकूर मी सांगितला.
------आमच्या लहान पणा पासून आम्हा चौघी बहिणींना मामा आजोबा आणि मामी आजी नेहमी एक कुतुहलाचे जोडपे होते. आमचे वडील आणि मामा आजोबान मध्ये मामा-भाच्याचे खूपच घनिष्ट संबंध होते. ८ मार्च च्या पत्रात त्यांनी मला लिहिले होते की ब्रिटीश आमदानीत उमाजी नायिक नावाचा एक बंडखोर क्रांतीफाटक होता व त्याला त्याच्या भाच्याची पूर्ण साथ होती तसे आम्ही मामा-भाचे होतो. तेव्हा एक चाचा-भतीजा हिंदी सिनेमा निघाला होता आणि मी त्या दोघांना ह्या नावाने चिडवायचे. ताचे आमच्या आई सरोज कानिटकर बरोबर वैशोदेवी चे दर्शन, जयपूर, उदैपूर च्या ट्रिप्स चे वेगवेगळे किस्से अजूनही मामा आजोबा सांगायचे. आमच्या आजोबा अप्पा कानिटकर आणि वासंती कानिटकर आजीनी त्या काळात मामा आजोबा व मामी आज्जी च्या लग्नाला खूप पाठींबा दिला होता. आमच्या आजी कडून मामा आजोबांनी नाटक व नाट्य संगीताची आवड निर्माण केली आणि ते सतत नाटके आणि नाट्य संगीत भाघायाचे व गायचे. मी मार्च २०१० मध्ये जेव्हा ब्रीस्बाने ला गेले होते तेव्हा त्यांनी सर्व गाणी म्हणायला लावली. खरे तर ती सर्व गाणी आम्ही चौघी बहिणींनी जपून ठेवली आहेत. जेव्हा एकत्र असतो सर्व गाणी गातो. मामा आजोबा चे आमच्या वडिलान बरोबर नियमित पत्रलेखन असायचे हे आठवण आमच्या लहान पणा पासून आहे. मामा आजोबा चे सहस्त्र चंद्र दर्शन पुण्यात करिण्या साठी आमच्या वडिलान बरोबर बराच पत्र व्याहावर झाला होता हे मला मामा आजोबांनी सांगितले होते. पण आमच्या वडिलाची अकाली ऑगस्ट २००६ मध्ये मृत्यू झाल्या मुळे हे काही घडू शकले नाही. आणि प्रिय भाच्याचे वर्ष श्राद्ध मामाला करावे लागले ह्याचा खूप मोठा खंत मामा आजोबाना शेवट पर्यंत राहिला.
शर्मिली आणि नंतर मी ऑस्ट्रेलिया मध्ये स्तायिक झालो ह्याचा त्यांना नेहमी आनंद होता.
शेवटी मी हेच म्हणेन....
ते दोन प्रवासी पक्षी उंच झेप घेवून उडून गेले,
आठवणी ओजळीत टाकून दूर आसमंतात विरघळले ,
दिशा त्यांनी दाखवली प्रेमाची व नाती दृढ करण्याची,
निरपेक्ष आणि निसंदेह कर्म करत राहण्याची.
भाऊ, आता तुम्ही सर्व एकत्र आहात पण आम्हाला विसरू नका. आम्ही अजूनही आकाशात डोळे लावून तुम्हाला शोधात असतो. माहेर च्या चांदण्यात ..... चन्द्राच्या प्रकाशात...
तुमचीच
शर्वरी
२३.०४.२०१२
No comments:
Post a Comment